पत्नीनेच काढला पतीचा काटा!
सातारा : खरा पंचनामा
साताऱ्यात दि. 24 जानेवारीच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास वाढेफाटा परिसरात अमित भोसले याचा 4 गोळ्या झाडुन खुन करण्यात आला होता. पोलिसांनी 10 पथकं संशयितांच्या शोधासाठी पाठवली होती. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या पत्नीनेच सुपारी देऊन त्याचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
खुन ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी खुप अंधार होता. त्यामुळं कोणताच सबळ पुरावा उपलब्ध नव्हता. यामुळं तपासात मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, एसपी समीर शेख यांनी पोलीस दलातील खास डिटेक्शन मधील अनुभवी अधिकाऱ्यांना काही सुचना देवुन त्यांच्यावर जबाबदारी सोपवत तपासाची चक्र फिरवली. 7 जिल्हे पोलीस पथकांनी पालथे घातल्यानंतर मोबाईल कॉल डिटेल्स आणि गोपनीय माहिती तसंच विश्लेषणाच्या आधारे मार्ग काढत सातारा पोलीसांनी अखेर 5 आरोपींना गोव्यातुन अटक केली. यातील धक्कादायक बाब म्हणजे या खुनाची सुपारी मयत अमित भोसले याच्याच पत्नीनं दिली असल्याचं तपासात निष्पन्न झाल.
यातील काही आरोपी पुण्यातील असुन बाकी आरोपी साताऱ्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. यात एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी दिली. पत्नीला मयत अमित भोसले सतत त्रास देत होता. सतत भांडणं होत होती आणि त्याचे बाहेर अनैतिक संबंध होते. याच कारणातुन मयत अमित भोसले याच्या पत्नीने त्याचा काटा काढल्याची कबुली आरोपीनं दिल्याचं पोलीसांनी सांगितलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.