Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत इमारतीवरून पडून डॉक्टरच्या मुलीचा मृत्यू

मिरजेत इमारतीवरून पडून डॉक्टरच्या मुलीचा मृत्यू




मिरज : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील झारीबाग परिसरातील एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने यशवी देशमाने या चार वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. घरात कोणी नसताना ही घटना घडली. मिरजेतील एक्सरे तज्ञ डॉ. निलेश देशमाने यांची ती मुलगी होती.

डॉ. देशमाने झारीबाग परिसरात असणाऱ्या एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर राहतात. डॉ. देशमाने यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी आजारी असल्याने देशमाने दाम्पत्याने सोमवारी रात्री तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. मात्र यावेळी रुग्णालयात जात असताना  त्यांची लहान मुलगी यशवी  ही झोपली होती. त्यामुळे डॉ. देशमाने  दाम्पत्य मोठ्या मुलीला घेऊन घर बंद करून दवाखान्यात गेले. ते बाहेर जात असताना गडबडीत गॅलरीचा दरवाजा मात्र बंद करण्यास विसरले होते.

थोड्या कालावधीनंतर  यशविला जाग आली. ती पालकांना शोधत गॅलरीत गेली. त्याचवेळी ती पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने  गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.