Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'एसपी'नी केलेली बदली 'मॅट'ने केली रद्द!

'एसपी'नी केलेली बदली 'मॅट'ने केली रद्द!



नांदेड : खरा पंचनामा

पोलिस अधीक्षकानी केलेली क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याची बदली 'मॅट'ने रद्द केली. ही घटना नांदेडमध्ये घडली. नांदेड 'क्राईम ब्रांच'चे विद्यमान पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची बदली रद्द झाली. विशेष म्हणजे आपल्या अन्यायकारक बदलीला 'मॅट'मध्ये चिखलीकर यांनी दाद मागितली होती.

नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील एकूण 85 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये क्राईम ब्रांचचे प्रभारी द्वारकादास चिखलीकर यांची बदली केली होती. तर चिखलीकर यांच्या सेवानिवृत्तीला केवळ सात महिने शिल्लक आहेत. त्यामुळे बदली अधिनियम 2005 आणि 2018 च्या शासन परिपत्रकानुसार त्यांची बदली इतरत्र करता येत नाही किंवा त्यांच्या इच्छेशिवाय बदली करू नये, असे बंधनकारक आहे. मात्र असे असताना त्यांची बदली झाल्याने त्यांनी थेट 'मॅट'मध्ये धाव घेतली होती.

दरम्यान नियमाच्या विरुद्ध आणि राजकीय दबावातून आपली बदली झाल्याचा आरोप करून चिखलीकर यांनी 'मॅट'मध्ये दाद मागितली होती. यापूर्वी चिखलीकर यांनी दोन वेळेस पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन माझी बदली करू नये, अशी मागणी केली होती. तसेच बदली केल्यास मॅटमध्ये जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतरही त्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी बदलीचे आदेश हाती पडताच चिखलीकर यांनी थेट औरंगाबाद गाठून 'मॅट'मध्ये बदली रद्द करण्याची मागणी केली होती. तर मंगळवारी चिखलीकर यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन 'मॅट'ने त्यांची झालेली बदली रद्द केली. तसेच पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या आदेशाला स्थगिती देत चिखलीकर यांची क्राईम ब्रांचचे प्रभारी म्हणून नियुक्ती कायम ठेवली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.