स्पेअर पार्टस, बॅटरी चोरणाऱ्यास अटक : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
ऑटो इलेक्ट्रिक दुकानातून स्पेअर पार्टस आणि बॅटरी चोरणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरलेल्या 4 बॅटऱ्या, एक कार असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
अमित सुरेश सूर्यवंशी (वय 30, रा. पंचशील नगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्याचे आदेश एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांना दिले होते. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी एक पथक तयार केले होते.
या पथकाला एक तरुण पंचशील नगर येथे कमी किमतीत बॅटऱ्या विक्री करण्यासाठी उभारल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कारची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये 4 बॅटऱ्या आढळल्या. त्याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर त्याने त्या कलानगर येथील एका दुकानातून चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून बॅटऱ्या, मारुती कार (एमएच 10 सीए 3619) जप्त करण्यात आली. त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप शिंदे, संतोष गळवे, विक्रम खोत, जितेंद्र जाधव, संदीप पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.