संजय राऊत पुन्हा अडचणीत : ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे : खरा पंचनामा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. राऊत यांच्याविरोधात बुधवारी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्या नावाची सुपारी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेना नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी संजय राऊतांविरोधात ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव आहे, असाही आरोप मिनाक्षी शिंदेंनी केला आहे.
'ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे', असं संजय राऊत यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यामुळे ठाणे पोलिसांची एक टीम संजय राऊतांचा जबाब नोंदवण्यासाठी नाशिकला गेली होती.
संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले धमकीचे आरोप हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे, याची सखोल चौकशी गृह विभागाकडून करण्यात येईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.