छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला पुतळा सापडला
कॅलिफोर्निया : खरा पंचनामा
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामधील सॅन होजे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेला होता. पोलिसांनी तो शोधून काढला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून तो चोरण्यात आला होता. तर, या पुतळ्याचा भाग असलेला अश्वच्या पायांकडील भाग तसाच होता. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा चोरीला गेला होता.
दरम्यान, हा पुतळा अमेरिकेतील एका कुप्रसिद्ध भंगार दुकानात हा पुतळा सापडला आहे. संतापजनक बाब म्हणजे, या पुतळ्याला फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचं वजन सुमारे 200 किलो इतकं आहे. हा पुतळा उत्तर अमेरिकेतील सॅन होजे शहराला 1999 मध्ये पुणे शहराकडून भेट स्वरुपात मिळाला होता.
तो येथील ग्वाडालूप रिव्हर पार्कमध्ये बसवण्यात आला होता. 31 जानेवारीला या पुतळ्याची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. अखेर हा पुतळा अमेरिकेतल्या एका भंगाराच्या दुकानात सापडला. हे दुकान बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुप्रसिद्ध आहे. या दुकानातील कर्मचाऱ्यांनी तीन जण हा पुतळा घेऊन आल्याची माहिती पोलिसांना दिलीये.
त्यापैकी दोन पुरुष तर एक महिला होती. हे तिघं जण 29 जानेवारी रोजी हा पुतळा घेऊन या दुकानात आले होते. 9 फेब्रुवारी रोजी हा पुतळा या दुकानात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी या दुकानावर छापा टाकला आणि पुतळा हस्तगत केला. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नसून आरोपींचा शोध सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.