Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन : डॉ. तेली

चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन : डॉ. तेली



सांगली : खरा पंचनामा

सांगली, मिरज शहरासह ग्रामीण भागात चेन स्नॅचिंग करणारी टोळी सक्रिय झाली आहे. गेल्या महिनाभरात सातत्याने गुन्हे घडत असल्याचे चित्र आहे. या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून संशयितांना लवकरच गजाआड केले जाईल, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली, मिरज शहरातील मुख्य भागांसह विस्तारित भागात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लांबविणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातही चेन स्नॅचिंग करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत पत्रकारांनी पोलिस अधीक्षकांना प्रश्‍न उपस्थित केला.

त्याला उत्तर देताना डॉ. तेली म्हणाले, ‘‘चेन स्नॅचिंगच्या घटना गेल्या महिन्यांत वाढल्या आहेत. असे गुन्हे करणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पोलिस ठाण्यांसह एलसीबीच्या पथकास सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. लवकरच कारवाई केली जाईल.’’ 

डॉ. तेली म्हणाले, ‘‘शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गस्ती पथके वाढवण्यात येणार आहेत. शहरात उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीमध्ये अंमलदारांची उपस्थिती ठेवली जाईल. तसेच प्रमुख चौकांसह विस्तारित भागातील वाढीव गस्ती पथके तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’’

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.