आदित्य ठाकरे यांना अतिरिक्त पोलिस सुरक्षा पुरवणार!
मुंबई : खरा पंचनामा
युवा सेनाप्रमुख, राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी त्यांच्या याच यात्रेच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये गोंधळ झाला होता. त्यानंतर आता या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून, यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात असणार आहे. ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील महालगावात त्यांची सभा सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घातला होता. तर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सोबतच आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे. यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात असणार असून, ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे.
या घटनेनंतर अंबादास दानवे यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहले होते. ज्यात, "आदित्य ठाकरे यांचा "शिव संवाद" यात्रेचा महाराष्ट्र दौरा चालू आहे. मंगळवारी 7 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे ग्राम सचिवालय समोरील मैदानात जाहीर सभा सुरू असताना तेथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तर सभा संपवून तेथून निघताना आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चालून आला. सदर प्रकरणी सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. याची दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.