Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवृत्त न्यायाधीशांवर सीबीआयकडून गुन्हे दाखल

निवृत्त न्यायाधीशांवर सीबीआयकडून गुन्हे दाखल



अलाहाबाद : खरा पंचनामा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. एन शुक्ला यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. शुक्ला यांच्याकडे ब्लॅक मनी असल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे. शुक्ला यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्ला यांच्यावर याआधीही भष्ट्राचाराचे आरोप झाले होते.

सीबीआयने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नारायण शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपावरून नवीन गुन्हा दाखल केला आहे. 2014 आणि 2019 दरम्यान 2.5 कोटीची बेहिशेबी मालमत्ता जमवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या तपासात असे आढळून आले की, न्यायमूर्ती शुक्ला यांनी ब्लॅक मनी दोन ट्रस्ट, एक फाउंडेशन आणि रिअल इस्टेट कंपन्यांच्या माध्यमातून व्हाईट केला होता.

शुक्ला यांच्याकडे अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी मालमत्ता असल्याचे अनेक पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. निवृत्त न्यायामूर्ती शुक्ला यांनी 1 एप्रिल 2014 ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत 4.07 कोटी रुपयांची संपत्ती कमावली आणि खर्च केली. दरम्यान, या कालावधीत शुक्ला यांचे उत्पन्नाच्या एकूण उत्पन्न फक्त 1.53 कोटी रुपये होते. त्यामुळे शुक्ला यांच्याकडेल कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे.

शुक्ला यांच्या घरी आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या लखनौच्या गोल्फ सिटी भागातील निवासस्थानी तसेच अमेठीतील त्यांच्या मेहुण्याच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली. या तपासादरम्यान, शुक्ला यांच्या मोबाईल फोनचा डेटा काढण्यात आला. यामध्ये शुक्ला यांचे सुचिता तिवारीशी संबंध असल्याचं उघड झालं. शुक्ला यांनी पहिली पत्नी सैदीन यांच्या नावावरही मालमत्ता घेतल्याचं समोर आलं आहे. शुक्ला यांच्यावर भ्रष्टाचाराचा हा दुसरा आरोप आहे. 2021 मध्ये, लखनौच्या प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस शी संबंधित न्यायालयीन भ्रष्टाचाराच्या तपासात शुक्ला यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होतं, असे सीबीआयने सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.