Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रविंद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज रद्द करा : भाजपची मागणी

रविंद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज रद्द करा : भाजपची मागणी



पुणे : खरा पंचनामा

भारतीय जनता पक्षाकडून कॉंग्रेसचे कसबा पेठचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. भाजपचे संघटन मंत्री राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. 

रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर आंदोलन करुन आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आणि धंगेकरांच्या सभेत धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात येणार आहे. आचारसंहितेचा भंग करत रविंद्र धंगेकर उपोषणाला बसले होते असा आरोप भाजपने केला आहे.

कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून पैशांचा वापर सुरु आहे, असा आरोप काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार ते आज सकाळी 10 वाजता पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसले होते. या उपोषणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या उपोषणाला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता तरीही भाजपचे नेते रात्री 9 वाजेपर्यंत भाजप नेते प्रचार करत होते. ही साफ लोकशाहीची हत्या आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर केला. मागील काही दिवस पुण्यात पैशांचा पाऊस पडत आहे. हे सगळं पोलीस प्रशासन उघड्या डोळ्याने बघत असतात. ही दडपशाही आहे, असंही ते म्हणाले. काही वेळाने पोलिसांनी धंगेकरांना कारवाईचं आश्वासनं दिलं त्यानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलं. 

मात्र धंगेकरांचा हाच उपोषणाचा मुद्दा समोर ठेवून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यांनी थेट धंगेकरांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.