मद्यधुंद पोलिस अधिकाऱ्याने घातला राडा!
औरंगाबाद : खरा पंचनामा
एका पोलीस अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत महिलांना अश्लील शिवीगाळ करत राडा केला आहे. अनिल बोडले असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. हा पोलीस अधिकारी महिलांना शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
दारूच्या नशेत महिलांसोबत गौरवर्तन करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी मध्यरात्रीपर्यंत महिलांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. अखेर या पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये गुरुवारी रात्री मद्यधुंद अवस्थेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने महिलांना अश्लील शिवीगाळ करत चांगलाच राडा केला. अनिल बोडले असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.
या घटनेनं महिला चांगल्याच आक्रमक झाल्या. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी मध्यरात्रीपर्यंत जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेर या पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेनंतर महिला चांगल्याच आक्रमक झाल्या, त्यांनी या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तसेच त्याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात मध्यरात्री ठिय्या केला. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने कॉलनीतील महिलांना शिवीगाळ कतर राडा केला. तसेच महिलांच्या अंगावर बॉल फेकून मारला असं आपल्या तक्रारीमध्ये महिलांनी म्हटलं आहे. या पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.