सिद्धू मुसेवालाच्या दोन मारेकऱ्यांचा कारागृहात खून
चंदीगड : खरा पंचनामा
पंजाबच्या तरनतारन येथील गोइंदवाल मध्यवर्ती कारागृहात पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील आरोपींना ठेवण्यात आलं होतं. यातील तीन आरोपींमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन आरोपींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक आरोपी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मनदीप तुफान आणि मनमोहन, अशी मृत्युमुखी पडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर केशव असं गंभीर जखमी झालेल्या आरोपीचं नाव आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुंड मनदीप सिंग तुफानची कारागृहातील कैद्यांशी काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर कैद्यांनी त्याला बेदम मारहाण केली.
या मारहाणीत मनदीप तुफान, मनमोहन यांचा जागीच मृत्यू झाला. तर केशव हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत तूफान हा सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील आरोपी होता. याच प्रकरणी मनदीप तुफान याला पोलिसांनी गँगस्टर मनी रियासह अटक केली होती.
तुफानला तरनतारनच्या वैरोवाल ठाणे अंतर्गत खाख गावातून अटक केली होती. गँगस्टर मनदीप तुफान हा जग्गू भगवानपुरिया टोळीचा शार्प शूटर होता. जग्गू भगवानपुरियाची चौकशी केल्यानंतर त्याचे नाव मूसवाला खून प्रकरणात समोर आले होते.
गँगस्टर मनमोहन आणि केशव हेही मूसवाला खून प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. याच प्रकरणातील आरोपींना देखील पोलीसांनी अटक केली असून तपास सुरू आहे. सिद्धू मुसेवाला याची मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.