शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या
पुणे : खरा पंचनामा
पुणे मनसेमधून बाहेर पडलेले मनसे माथाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष निलेश माजरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. माजरे यांनी मनसेची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.
निलेश माजरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आत्महत्येचे नेमके कारण अजून समजू शकलं नाही मात्र कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याची चर्चा आहे. निलेश माजरे यांची मनसेला 'जय महाराष्ट्र'करत जवळपास ४०० कार्यकर्त्यांना सोबत घेवून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.