Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कारागृहाबाहेर डोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या!

कारागृहाबाहेर डोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या! 



मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईतील भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

श्याम वरगडे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते ताडदेव लोकल आर्म युनिट 2 मध्ये कार्यरत होते. श्याम वरगडे यांची नियुक्ती भायखळा जेलच्या गेटवर करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर नागपाडा पोलीस दाखल झाले. वरगडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. 

दरम्यान, या हवालदाराने एवढं टोकाचं पाऊल का उचललं? या संदर्भात आता नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.