Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इस्राईलच्या राजदुतांची छत्रपतींना मराठमोळी मानवंदना !!

इस्राईलच्या राजदुतांची छत्रपतींना मराठमोळी मानवंदना !!



मुंबई : खरा पंचनामा

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभर प्रचंड जल्लोषात साजरी होत असताना मुंबईतील इस्राईलचे राजदूत कोबी शोशनी यांनी शिवाजी महाराजांना मराठमोळी मानवंदना दिली आहे. इस्राईलच्या दुतावासाने एक ट्विट करत शिवजयंतीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये राज्यातील शिवजयंती सोहळ्याचा व्हिडीओ ट्विट करत या व्हिडीओच्या माध्यमातून इस्राईलच्या राजदुतांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते.

आग्र्याच्या किल्ल्यात आज इतिहासात पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून १० हजार शिवभक्त दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव किल्ल्यात केवळ ४०० शिवभक्तांना प्रवेश मिळणार आहे.

शिवजयंती निमित्त लाल किल्ल्यावर शिवरायांच्या शौर्यावर आधारित नाटक आणि विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशनच्या वतीने लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.