डॉ. बसवराज तेली यांची वरिष्ठ
पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती
सांगली : खरा पंचनामा
सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना वरिष्ठ अधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. डॉ. तेली यांनी तीन महिन्यापुर्वी सांगली जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून पदभार स्विकारला होता.
डॉ. तेली हे यापुर्वी नागपूर शहर आयुक्तलयात उपायुक्त पदावर कार्यरत होते.
सन २०१० मध्ये भारतीय पोलिस सेवेत ते दाखल झाले. श्री. तेली हे मुळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथील आहेत. नागपुरपुर्वी ते वर्धा येथे पोलिस अधीक्षक होते. त्यापुर्वी पुण्यात उपायुक्त म्हणून त्यांनी दमदार कामगिरी केली. नागरपूर येथे दोन वर्षांपासून ते कार्यरत होते. रस्त्यावर उतरून पोलिसींग हे त्यांचे वैशिष्ट आहे.
सांगलीचा पदभार स्विकारल्यानंतर अवैध धंद्यांसह गुन्हेगारी मोडित काढण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला. बेसिक पोलिसींगसाठी त्यांनी गेल्या तीन महिन्यांत विविध उपक्रम हाती घेतले. सन २०१० च्या आयपीएस बॅचचे तेली यांची १२ वर्ष सेवा पुर्ण झाल्याने त्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.