म्हणून मी कॅनडाचा पासपोर्ट घेतला : अक्षयकुमार
मुंबई : खरा पंचनामा
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार सातत्याने चर्चेत येत असतो. चित्रपटांप्रमाणेच एका मुद्द्यावरून त्याच्यावर बरीच टीका होते तो मुद्दा म्हणजे कॅनडाचे नागरिकत्व, यावरच त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
कॅनडाच्या नागरिकत्वावरून अक्षय कुमार बऱ्याचदा चर्चेत येत असतो. त्याच्यावर टीकादेखील होत असते. मात्र या टीकेमुळे त्याला वाईट वाटते. तो असं म्हणाला, "भारत माझ्यासाठी सर्व काही आहे. मी जे काही कमावले आहे, मी काही मिळवले ते येथून आहे. आणि मी भाग्यवान आहे की मला परत देण्याची संधी मिळते. कधी कधी वाईट वाटतं जेव्हा लोक नकळत काहीही गोष्टी बोलतात.
अक्षयकुमारने सांगितले की, ९० च्या दशकात त्याचे चित्रपट चालत नव्हते म्हणून त्याने कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. "माझे चित्रपट चालत नव्हते मात्र काम तर करावे लागणार होते. मी कामासाठी कॅनडामध्ये गेलो कारण माझा मित्र कॅनडामध्ये होता आणि तो म्हणाला, 'इथे ये'. मी अर्ज केला आणि मी गेलो. मात्र माझे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि नशिबाने ते सुपरहिट ठरले. तेव्हा माझा मित्र म्हणाला "तू परत जा आणि पुन्हा काम सुरु कर." मला आणखी काही चित्रपट मिळाले आणि मला अधिक काम मिळत राहिले. "
तो पुढे म्हणाला, माझ्याकडे पासपोर्ट होता हे मी विसरलो. मी हा पासपोर्ट बदलला पाहिजे असा मला कधीही विचार नव्हता. परंतु होय, आता मी माझा पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.