Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत मोबाईल, दागिने चोरट्यास अटक : शहर पोलिसांची कारवाई

सांगलीत मोबाईल, दागिने चोरट्यास अटक : शहर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

शहरातील कर्नाळ रस्ता परिसरातील काकानगर येथील झेंडा चौक परिसरातून मोबाईल आणि दागिने चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे मोबाईल दागिने असा १ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.   

इफ्तेखार अख्तरहुसेन शेख (वय ३८, मूळ रा. गणेशनगर, सध्या रा. शिवशंभो चौक, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरीतील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.    
 
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना काकानगर येथील झेंडा चौक परिसरात एकजण सोन्या-चांदीचे दागिने तसेच मोबाईल विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने दागिने आणि मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच 10 बीडी 7987) असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडून चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 

शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मागर्दशर्नाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, झाकीर काझी, अभिजित माळकर, राजेश पाटील, विनायक शिंदे, संदीप पाटील, अमित मोरे, आरिफ मुजावर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.