चिंचवडसाठी नाना काटे उमेदवार : जयंत पाटील यांचे ट्विट
मुंबई : खरा पंचनामा
चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण यांच्या निधनामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने हि जागा बिनविरोध करण्याची मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडीने भाजपची मागणी धुडकावून लावत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करुन चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी नाना काटे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीने नाना काटे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे, असे जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
चिंचवड आणि कसबा निवडणूकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून बराच काळ सस्पेन्स ठेवण्यात आला होता. महाविकास आघाडीकडून कसब्याची जगा काँग्रेसला आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली.
सोमवारी अजित पवारांनी पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची पिंपरी चिंचवडमध्ये येऊन बैठक घेतली. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे हे अजित पवारांना
त्यांच्या घरी जाऊन भेटले. त्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करतील आणि अजित पवार या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी पोहचतील असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.