Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत ट्रकच्या धडकेत मजूर ठार

सांगलीत ट्रकच्या धडकेत मजूर ठार



सांगली : खरा पंचनामा

सांगली-मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डसमोरील चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत सायकलस्वार मजूर ठार झाला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान ट्रक चालकास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

श्रीकिशन ठाकूर (वय ४५, देवरीया, उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे. श्रीकिशन ठाकूर हे मूळचे उत्तरप्रदेशमधील आहे. सांगलीत ते सुतार काम मजूर म्हणून काम करत होते. येथील चांदणी चौकात ते एका भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. आज रात्री नऊच्या सुमारास ते भाजीपाला खरेदी करून चांदणी चौकाकडे निघाले होते. त्यावेळी सांगलीहुन मिरजेच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला ट्रकने (एम एच १० एम व्ही ८१७२) त्यांना जोराची धडक दिली. 

यामध्ये ठाकूर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, वर्दळीच्या ठिकाणी अपघात झाल्याने परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली. काही नागरीकांनी तत्काळ विश्रामबाग पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेला. रात्री उशीरा मृताची ओळख पटवण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.