राज्यातील वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच मंगळवारी राज्यातील वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने बदल्यांचे हे आदेश आज काढण्यात आले आहेत.
नागपूरच्या अपर पोलिस आयुक्त श्रीमती नीवा जैन यांची अपर निवासी आयुक्त, सचिव व निवासी आयुक्त महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. राज्य पोलिस सेवेतील अधिकारी अभिजीत शिवथरे पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. त्यांची सहाय्यक पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था पोलिस महासंचालक मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. नाशीक शहरच्या पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांची मीरा-भाईंदर,-वसई-विरारच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक राहुल खाडे यांची जालन्याचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी बिपिन कुमार सिंह यांची आथिर्क गुन्हे शाखेचे अपर पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रभात कुमार यांची अपर पोलिस महासंचालक व उप महासमादेशक होमगाडर् येथे नियुक्ती करण्यात आली आहे. विनित अगरवाल यांची अपर पोलिस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी म्हाडा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके येथे नियुक्ती करण्यात आली आहे. जय जाधव यांची राज्य मानवी हक्क आयोगाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डी. के. पाटील-भुजबळ यांची गुन्हे अन्वेषण विभाग पुणेच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. कैसर खालिद यांची पुण्याच्या मोटार परिवहन विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एस. एच. महावरकर यांची नांदेडचे पोलिस उप महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.