Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'शिवशाही'त आढळला मृतदेह!

'शिवशाही'त आढळला मृतदेह!



कराड : खरा पंचनामा

कराड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञाताचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. कराड मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या 15 दिवसापासून एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 असावे, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.

कराड बसस्थानक परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाबाबत घातपात झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कदाचित गारठ्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. तरीही शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.