Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बेळगाव महापालिकेत भाजपची मोठी खेळी!

बेळगाव महापालिकेत भाजपची मोठी खेळी!



बेळगाव : खरा पंचनामा

बेळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवड सोमवारी झाली. महापौरपदी मराठी नगरसेवक शोभा सोमना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड झाली. बेळगाव महानगर पालिकेत सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. भारतीय जनता पक्षाकडे अनेक कन्नड संघटनांनी कन्नड उमेदवार महापौरपदी द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु भाजपने मराठी उमेदवारालाच दोन्ही पदे देत कन्नड संघटनांना धक्का दिला. 

या निवडीनंतर बेळगावमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. कर्नाटक भाजपने केलेल्या या खेळीचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. भाजप कोअर कमिटीच्या घोषणेनंतर महापौरपदी भाजपच्या शोभा सोमना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड केली. सोमवारी निवडणूक असल्यामुळे पालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी भगवा फेटा बांधला होता. बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

भाषिक मुद्दयावर होणारी निवडणूक यावेळी पक्षाच्या मुद्दयावर झाली असल्याने आता पक्षीय राजकारणाचे चित्र बेळगाव महानगरपालिकेच्या दिसणार आहे. महानगरापालिकेत भाजप बहुमतात होता. त्यामुळे भाजप ठरवेल तोच महापौर होणार होता. आता काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेता कोण असणार हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे.

महापौराच्या एकंदर कामकाजाला योग्य कक्षेत आणण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची ठरणार असते. बेळगाव महानगरपालिका सभागृहात यापुढील काळात कोणत्या पद्धतीने राजकारण चालणार याचे संकेत आताच मिळू लागले आहेत. परंतु काँग्रेसनेही भाजप प्रमाणे मराठी उमेदवार द्यावा, अशी मागणी होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.