Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती!

धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती!



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. थेट मंत्रालयातून या बनावट भरतीचे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयातील कर्मचारीच हे बनावट लिपिक भरतीचे रॅकेट चालवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

बोगस रॅकेट चालवल्याप्रकरणी गोवंडी पोलिस ठाण्यात मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या यशवंत कदम यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. या घोटाळ्यात गोवंडीमधील एका तरुणाची सात लाखांहून अधिक रुपायाची फसवणूक झाली होती.

या बोगस लिपिक भरती प्रकरणी माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करत नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र देण्यात आले होते. याप्रकरणी निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकरविरोधात गुन्हा नोंदवत माळवेला अटक करण्यात आली आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, 'या प्रकरणातील शुभम मोहिते नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. या नावाची कुठलीही व्यक्ती कार्यरत नव्हती. नोकरीसाठी देण्यात आलेले आदेशपत्रही बनावट आहे. असे आदेशपत्र देण्यात येत नाही. या आदेशपत्रात बनावट सही-शिक्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पोलीस अधिकाऱ्याशी भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे' अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान या बोगस भरती प्रकरणात मंत्रलयातील आणखी नावे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.