गुन्हेगार पकडा अन रोख बक्षीस मिळवा!
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसात कोयता गँगने धूमाकुळ घातला असून गोळीबाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शहरात गुंडाचा वाढता धूमाकुळ पाहता पोलिसांसमोर आव्हान उभे राहीले असून या गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलिसांना आता रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
यानुसार पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणाऱ्याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील हजारो रुपयांची बक्षीसे देण्यात येणार असून पुणे पोलिसांची ही बक्षीस योजना चांगलीच चर्चेत आली आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम आणि पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी ही बक्षीस योजना जाहीर केली आहे. कोयता गँग वाढती गुन्हेगारी थांबवण्याच्या या पार्श्वभूमीवर आता सराईतांना पकडण्यासाठी पुणे पोलिस ऍक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. पुणे पोलिसांनी बक्षीस योजना जाहीर केली असून आरोपींना पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बक्षीसांची खैरात केली जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.