नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकाला दहा वर्षांची शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
पलूस तालुक्यातील एका गावात नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी ही शिक्षा सुनावली.
नागेश हंबीरराव होवाळ (वय ३६) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.
फेब्रुवारी २०१६ मध्ये हा प्रकार घडला होता. पिडीता ही आरोपीच्या ओळखीची आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये पिडीतेची तब्येत बिघडल्याने तिला डॉक्टरकडे नेण्यात आले असता, ती सहा महिन्याची गरोदर असल्याचे समजले. यावेळी पिडीतेच्या आई-वडीलांनी तिच्याकडे चौकशी केली. यात आरोपी होवाळ याने पिडीतेला खून करण्याची धमकी देवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तिने सांगितले. यानंतर सांगलीतील एका केंद्रात तिला दाखल करण्यात आले. व पोलिसात होवाळविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. बोंदर, बी. डी. ढेरे यांनी केला. घटनास्थळाचा पंचनामा व पिडीतेचे, डीएनए सॅम्पल न्यायवैद्यानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यानंतर होवाळे विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकारपक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीता, तिची आई यांचा जबाब, सर्वेाच्च व उच्च न्यायालयातील न्यायनिवाडे या सगळ्यांचा विचार करून होवाळ यास दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. कारावासासह ३० हजार रूपये दंड भरण्याचेही आदेश देण्यात आले. कुंडल पोलिस ठाण्याचे कर्मचारी संभाजी शिंदे, पैरवी कक्षातील सुनिता आवळे, वंदना मिसाळ, दीपाली सूर्यवंशी यांचे सरकार पक्षाला सहकार्य मिळाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.