फोन टॅपिंग प्रकरणातील रश्मी शुक्ला झाल्या महासंचालक
नवी दिल्ली : खरा पंचनामा
फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पदोन्नती मिळाली आहे. शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी पदोन्नती एसीसीकडून मंजूर करण्यता आली आहे.
महाराष्ट्रातील अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते या दोन आयपीएस अधिकाऱ्यांसह देशातील एकूण २० आयपीएस अधिकाऱ्यांनाही बढती मिळाली आहे. काल दिल्ली येथे मोठी बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राने ऐतिहासिक असे राजकीय नाट्य अनुभवले होते. शिवसेनेने भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती.
हे सर्व राजकीय नाट्य तब्बल ३६ दिवस सुरु होते. या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप होता.
गुप्तवार्ता विभागाने रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून फोन टॅप केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप करायचे आहेत, त्यांची बनावट नावं सांगून, हा सगळा उद्योग करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.