Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा



लंडन : खरा पंचनामा

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. महाराजांची जयंती फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यातच लंडन येथे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी लंडन येथिल संसद चौकात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यार्थांनी जय शिवराय अशा घोषणांनी संसद भवन परिसर दणाणून सोडला.

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे दाखले देणारे अनेक युद्ध साहित्य लंडन येथिल म्यूजियमला आहे. शिवाजी महाराजांचे एक अस्सल पेंटिंग देखील ब्रिटिश लायब्ररीला आहे. जगासमोर एक नवा आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव लंडनच्या संसद चौकात साजरा करताना उपस्थित युवकांत नवचैतन्य निर्माण झाले होते.

संपूर्ण महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.