Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी!

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी!



नवी दिल्ली : खरा पंचनामा

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला (एनआयए) मुंबईत दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. धमकीचा मेल मिळाल्यानंतर एनआयएने मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. धमकीच्या या मेलनंतर मुंबईसह देशभरातील विविध शहरांना सतर्क राहाण्यास सांगण्यात आले आहे.

एनआयएला पाठवण्यात आलेल्या व्यक्तीने आपण तालिबानी असल्याचे ई-मेलमध्ये म्हटले असून, तालिबानी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार ही धमकी दिली जात असल्याचा दावा केला आहे.

या ईमेलनंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना सावध करण्यात आले असून, देशातील विविध शहरांना अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, हा ई-मेल कुठून आला तसेच मेल पाठवणारी व्यक्ती कोण आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, विमानतळ, रेल्वे स्थानक यासह अनेक ठिकाणी तपासासोबत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

मागील महिन्यातही एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.