बदली झाल्याने पोलिस निरीक्षकाने एसी, पडदे, खुर्ची, टेबलही नेले काढून!
चंद्रपूर : खरा पंचनामा
चंद्रपुरात बदलीमुळे नाराज झालेल्या एका पोलीस निरीक्षकाने चक्क आपल्या कार्यालयातील टॉयलेटचे दार, खुर्ची, टेबल, एसी, पदडे आणि दिवे काढून नेल्याचा प्रकार समोर आला. आपली नाराजी दर्शवण्यासाठी या पोलीस निरीक्षकाने हे कृत्य केले असावे अशी चर्चा आहे. दरम्यान असेच प्रकार सांगलीतही यापूर्वी घडले आहेत.
बाळासाहेब खाडे असं या पोलीस निरीक्षकाचं नाव असून ते चंद्रपूर एलसीबीत कार्यरत होते. बाळासाहेब खाडे यांची गुरुवारी मानव संसाधन विभागात बदली झाली. परंतु त्यांना हा निर्णय रुचला नाही. या बदलीने नाराज होत त्यांनी तातडीने शुक्रवारी एलसीबीच्या कार्यालयात येत टॉयलेटचे दार, खुर्ची - टेबल, एसी, पदडे आणि दिवे या सर्व वस्तू काढून नेल्या.
बाळासाहेब खाडे यांचा स्थानिक गुन्हे शाखेत 2 वर्ष 3 महिन्याच्या कार्यकाळ पूर्ण झाला होता. पोलीस अधीक्षकांनी गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील 34 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात बाळासाहेब खाडे यांची मानव संसाधन विभागाच बदली करण्यात आली. मात्र बदलीनंतर बाळासाहेब खाडे यांनी केलेल्या या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान नवीन आलेल्या पोलीस निरीक्षकांमुळे पोलीस दलाची बदनामी होऊ नये म्हणून तातडीने पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयाच्या डागडुजीला सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान असेच प्रकार सांगली जिल्ह्यातही घडले आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी जुन्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या अडगळीत टाकल्या. शिवाय कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या खुर्च्या वापरण्यास घेतल्या. तर अनेकांनी नामफलकावरून संबंधित अधिकाऱ्यांची नावेच पुसून टाकल्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे चंद्रपूर येथेही सांगलीची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.