Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बीबीसीच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सचे छापे

बीबीसीच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सचे छापे



मुंबई : खरा पंचनामा 

गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट बीबीसीने प्रदर्शित केला. याची चांगलीच चर्चा होत असताना आज बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीमधील कार्यालयावर आयकर विभागाने अचानक छापा टाकला. या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.

बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रदर्शित केलेल्या माहितीपटानंतर देशात खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असा दावाही करण्यात आला. याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली.

यावेळी करण्यात आलेल्या छापेमारीत अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतले असून या छापेमारीमध्ये 50 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत.

दरम्यान न्यायालयाने नुकतेच बीबीसीच्या त्या डॉक्युमेंटरीवर बंदी घालता येणार नाही असे मतही नोंदवले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.