Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शहरांची नावे बदलून विकास होत नसतो : रामदास आठवले

शहरांची नावे बदलून विकास होत नसतो : रामदास आठवले



नाशिक : खरा पंचनामा

आपल्या मिश्किल कवितांमधून विरोधकांवर बरसणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतर मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शहराची नावं बदलून शहराचा विकास होत नसतो, अशा शब्दात आठवले यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी देवळाली कॅम्प येथील जैन धर्मियांच्या कलापुर्णम या तीर्थधाम असलेल्या मंदिरास भेट दिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नुकेतच केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांसह जिल्ह्यांची नावे बदलली. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. अशातच नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री आठवले यांनी मात्र या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. 

मंत्री आठवले म्हणाले कि, नाव बदलून शहराचा विकास होत नसतो, त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे लागतात, त्यातून विकास साध्य होत असतो, लोकांना तो विकास अपेक्षित आहे ना कि शहराची नावे बदलण्याचा विकास, असे ते म्हणाले.

आठवले म्हणाले कि, सरकारच्या माध्यमातून विकास होतो आहे. नाव बदला अथवा बदलू नका. मात्र विकास महत्वाचा आहे. औरंगाबादचा विकास होतो आहे, मात्र दुसरीकडे उस्मानाबाद दुष्काळी भाग आहे. त्यामुळे या जिल्ह्यात जल संधारणाची कामे, उद्योग वाढीसाठीचे प्रयत्न सरकारने करणे आवश्यक आहे. नुसतं नाव बदलून विकास होत नाही, मात्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सर्व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या विकास लवकरच होईल, अशी अशा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.