Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एनआयएच्या ईमेलमुळे सतर्क एटीएसने दहशतवाद्याला घेतले ताब्यात!

एनआयएच्या ईमेलमुळे सतर्क एटीएसने दहशतवाद्याला घेतले ताब्यात!



मुंबई : खरा पंचनामा

एनआयएने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इमेल मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला होता. संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती एनआयएने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना याबाबत माहिती पुरवली होती. एनआयएने दिलेल्या माहितीच्या आधारे इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे. सरफराजच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएसचे पथक इंदूरमध्ये दाखल झाले आहे.

सरफराज मेमन हा चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन भारतात आल्याची माहिती एनआयएने दिली होती. या माहितीच्या आधारे  एनआयएने पोलिसांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं होते. एनआयएच्या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु होता, आता त्यामध्ये यश आलं असून पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे.

एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा ई-मेल पाठवण्यात आला होता. त्यानुसार, तपास यंत्रणाकडून तपास सुरु होता. संबंधित संशयित इसम सरफराजला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली असून त्यांची चौकशी करण्यात येईल. महाराष्ट्र एटीएस संशयित सरफराज मेमनची चौकशी करणार आहे.

मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे, अशी माहिती एनआयने मेलद्वारे पोलिसांना दिली होती. एनआयकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रंही पाठवली होती. त्याचा तपास सुरु होता. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबतही संपर्क साधत सविस्तर माहिती दिली. यानंतर इंदूर पोलिसांनी संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.