काँग्रेसच्या महत्वाच्या समित्यांमधून थोरातांना वगळले!
मुंबई : खरा पंचनामा
छत्तीसगड, रायपूरमध्ये या महिन्यात काँग्रेसचे ३ दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधी होणाऱ्या या पूर्ण अधिवेशनात ९ राज्यांच्या निवडणुका आणि मिशन २०२४ च्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मसुदा समिती आणि विविध उपसमूहांची स्थापना केली आहे. यातील एकाही समितीत बाळासाहेब थोरात यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुकुल वासनिक, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, मिलिंद देवरा अशा बड्या नेत्यांचा समावेश आहे. पण यातील एकाही समिती किंवा उपसमूहामध्ये बाळासाहेब थोरात यांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
केवळ वक्त्यांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र नाना पटोले यांच्याविरोधात राष्ट्रीय पातळीवर रोष व्यक्त केल्यानं त्यांचं नाव वगळलं आहे की तब्येतीच्या कारणामुळे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.