पत्नी, दोन मुलांना कालव्यात फेकून एकाची आत्महत्या!
कागल : खरा पंचनामा
एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवून स्वत: देखील आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सांगवडेवाडी येथे ही घटना घडली आहे. या घटनेत व्यक्तीने त्याची पत्नी, मुलगी आणि मुलाचा खून केला. सुदैवाने या घटनेत मुलगी बचावली आहे.
शुक्रवारी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या कालव्यात ही घटना घडली.
त्या व्यक्तीने आपली पत्नी, मुलगी आणि मुलाला याच कालव्यात ढकलून दिलं आहे. या प्रकरणी संदीप अण्णासाहेब पाटील असे संशयित वडीलांचे नाव आहे. मुलीला शुद्ध आल्यावर काल रात्री उशिरा तिने दिलेल्या जबाबनुसार वडीलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कालव्यात शुक्रवारी दुपारी राजश्री संदीप पाटील पत्नी, सन्मित संदीप पाटील मुलगा आणि श्रेया मुलगी यांना ढकलून देण्यात आलं होतं. तसेच स्वत: कर्नाटकात जाऊन पाटील याने आत्महत्या केली.
पाण्यात पडल्याने पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. मात्र मुलीला पोहता येत असल्याने ती बचावली आहे. पाण्यात अडकलेली असताना बचावासाठी मदत मागताना तिचा आवाज काहींना ऐकू आला. त्यावेळी त्यांनी तिला मदत करत कसबा सांगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
दरम्यान, संदीप पाटील यांनी एवढं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.