विवाहित गर्भवतीवर अत्याचार : संशयित पसार
सांगली : खरा पंचनामा
वाळवा तालुक्यातील एका गावातील विवाहित गर्भवतीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर संशयित पसार झाला आहे. त्या संशयितास अटक करावी अशी मागणी केली जात आहे.
राहुल तारासिंग चव्हाण (रा. सोलापूर) असे या संशयिताचे नाव आहे. २० फेब्रुवारीला पीडित महिलेने त्याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. या संशयिताने अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेस तिच्या पतीला दोघांचे एकत्रित फोटो दाखविण्याची भीती घालत तिच्याकडून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठीसुद्धा उकळली आहे.
हा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू होता. चव्हाण याच्याविरुद्ध विनयभंग, बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेतील संशयितास पोलिसांनी अटक न केल्यास २७ फेब्रुवारीला रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अर्जुन पाटील, निवास पाटील, श्रेया जाधव, धनश्री चव्हाण, स्वाती माने, नीलिमा हुलके, पूनम पाटील, भूषण पवार, स्वप्नील कांबळे, हसीब अत्तार यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रती पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.