Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कसब्यातून रोहित टिळक यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव होता पण...

कसब्यातून रोहित टिळक यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव होता पण...



सोलापूर : खरा पंचनामा

कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय. दोन्ही मतदारसंघात जनतेची भाजपवर नाराजी आहे. भाजपचे कसब्यातील समीकरण फसलेलं आहे. काँग्रेसकडून रोहित टिळक यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव होता. मात्र त्यांनी तो नाकारला असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

बदललेल्या समीकरणचा फटका त्यांना बसेल. पिंपरी चिंचवड मध्ये उमेदवाराला नाही मात्र भाजप आहे म्हणून फटका बसेल. दोन्ही मतदारसंघात परिवर्तन झालेले आपल्याला पाहायला मिळेल, असं रोहित पवार म्हणालेत. रोहित टिळकांना काँग्रेसकडून उमेदवारीचा प्रस्ताव केलेला होता मात्र त्यांनी तो नाकारल्याची माहिती आहे.

भाजपने कसब्यातले जे समीकरण केलं आहे. रासनेंना उमेदवारी दिली आहे. ते यशस्वी ठरलं तर या पुढच्या काळामध्ये तेच समीकरण या पुढच्या काळात राबवलं जाईल. मात्र भाजपने तसं समीकरण राबवलं तर कसब्यातले मतदार भाजपसोबत राहणार नाहीत, असंही रोहित म्हणालेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.