Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी निलंबित

सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी निलंबित



पुणे : खरा पंचनामा

कोणतीही परवानगी न घेता मोक्कातील आरोपीला लॉकअ‍ॅपच्या बाहेर काढून घरझडतीसाठी नेल्यावर आरोपीला पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचार्‍याला सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक  यांनी निलंबित केले आहे. 

सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे आणि पोलीस नाईक महेश जाधव अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. पुण्यातील मार्केट यार्ड येथील आंगडियाच्या कार्यालयात शिरुन अविनाश गुप्ता याच्या टोळीने गोळीबार करीत तब्बल २८ लाख रुपये लुटून नेले होते याप्रकरणी पोलिसांनी गुप्ता याच्या टोळीला अटक केली. त्यांच्यावर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी गेल्या महिन्यात मोक्का कारवाई केली होती.

त्याचा तपास वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला होता. असे असताना रामदास मुंढे व महेश जाधव यांनी यातील ९ आरोपींपैकी संतोष पवार व साई कुंभार यांना कोणतीही परवानगी न घेता पोलीस कोठडीतून बाहेर काढले.
त्याला घर झडतीसाठी खानापूर येथे घेऊन येत असल्याचे साई कुंभार याचा मित्र राकेश नवसरे याला मोबाईलवरुन सांगितले. कोणताही पुरेसा पोलीस बंदोबस्त न घेता दोघांना खानापूरला नेले. 

त्यावेळी संतोष पवार पळून गेला. आरोपी पळून जाण्यास कर्तव्यात बेजबाबदार व बेफिकीर गैरवर्तन कारणीभूत ठरल्याने सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी दोघांना निलंबित केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.