Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वानखेडे स्टेडियमवर सचिनचा पुतळा उभारणार!

वानखेडे स्टेडियमवर सचिनचा पुतळा उभारणार!



मुंबई : खरा पंचनामा

माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर हा येत्या 24 एप्रिल रोजी वयाची 50 वर्ष पूर्ण करणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील वानखेडे स्टेडीयममध्ये सचिनचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे.

सचिन तेंडुलकर याला 2014 मध्ये भारत सरकारकडून देशाचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला होता. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत दमदार खेळी करून भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केले होते. त्याने मैदानात रचलेले बरेच रेकॉर्ड अजूनही कोणी तोडू शकलेले नाही. सचिनने 16 नोव्हेंबर 2013 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना त्याने वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. यावेळी त्याने आपल्या गुरुजनांपासून ते क्रिकेटमधील सहकाऱ्यांपर्यंत सर्वांचे आभार मानले. 

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे म्हणाले, "वानखेडे स्टेडियमवर हा पहिलाच पुतळा असेल, तो कुठे ठेवायचा हे ठरवायचे आहे. सचिन तेंडुलकर एक भारतरत्न आहे. त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. तो 50 वर्षांचा झाल्यावर हा पुतळा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून कौतुकाची भेट असले. मी तीन आठवड्यांपूर्वी त्याच्याशी बोललो आणि त्याची संमती घेतली." सचिनच्या 50 व्या वाढदिवशी या पुतळ्याचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.