किरीट सोमय्या उद्या येणार कोल्हापुरात
कोल्हापूर : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबाबाबत ईडीकडे तक्रार केलेले भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या गुरुवारी कोल्हापुरात येत आहेत. त्यांनीच ही माहिती ट्विट करून दिली आहे.
या भेटीत आपण जिल्हा सहकार निबंधक, बँक व कंपनीचे सदस्य, शेतकरी व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला चुकीच्या पद्धतीने पैसे पुरवल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर जिल्हा बँकेतून गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेतलेल्या 'ब्रिक्स' कंपनीला केलेला अर्थपुरवठाही वादग्रस्त होता, असे आरोप केले आहेत.
सोमय्या यांनी केलेल्या या आरोपामुळे गेल्या महिन्यात मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नातेवाईक व घोरपडे कारखान्यावर ईडीचा छापा पडला होता. 'ब्रिक्स'ला केलेल्या कर्जपुरवठ्याबद्दल बँकेच्या आजी-माजी संचालकांनाही 'ईडी'ने नोटीस काढली आहे. यातील तिघांना १४ फेब्रुवारी रोजी चौकशीला बोलवले होते. ते २०१५ ते २१ या कालावधीतील संचालकांच्या मागे हा
'ईडी'चा ससेमिरा लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच सोमय्या स्वतः २३ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात येऊन बँकेसह उपनिबंधक कार्यालयात भेट देणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.