Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

समुद्रात शिवस्मारक करण्याचा बेशरमपणा करू नका : भिडे

समुद्रात शिवस्मारक करण्याचा बेशरमपणा करू नका : भिडे



जुन्नर : खरा पंचनामा

कोट्यवधी रुपये खर्च करून समुद्रात शिवस्मारक करण्याचा बेशरमपणा करू नका, अशा शब्दात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी समुद्रात शिवस्मारक उभारण्यावरून वक्तव्य केले आहे.

जुन्नर येथे 'भिमाशंकर ते शिवनेरी धारातिर्थ गडकोट मोहिमेच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. हजारो धारकरी या मोहिमेत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात उभारण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी जोरदार टीका केली.

हिंदू म्हणून जगायचं असेल तर छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजे हे मृत्यूंजय मंत्र जपावे लागतील असे त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 289 लढाया तर छत्रपती संभाजी महाराजांनी 134 लढाया लढल्या, हिंदवी स्वराज्यासाठी सर्वस्व दिले, त्यांचे स्मरण करण्यासाठी मिरवणूका, उत्सव सोहळे करून चालणार नाही. तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे होकायंत्र समजून त्यांच्या विचारानुसार वागून, हिंदूस्थानची धारणा रक्तात भिनवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.