तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालासाठी मतमोजणी सुरू असून पहिला निकाल हाती आला तेव्हा, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांचा विजय झाला तरी तो भाजपचा विजय नसेल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबत एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ‘सत्यजीतचा विजय निश्चित आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह नेहमी राहणारचं आहे.’ त्यानंतर राजकीय वर्तुळात यावरून चर्चेला उधान आले होते.
दरम्यान, विधानपरिषदांच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल हाती येत आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांना नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांचा विजय म्हणजे भाजपचा विजय असेल का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, ‘नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा विजय झाला तरी, तो विजय भारतीय जनता पार्टीचा नसेल. कारण सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत.’
ते म्हणाले, ‘तो भाजपाच्या बाजुने निकाल नाहीये. भाजपाला त्याठिकाणी उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले.
त्यामुळे महाविकास आघाडीने धुळे जिल्ह्यातील महिला नेत्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली.’
दरम्यान, पहिला निकाल हाती आला तेव्हा कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी
शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. तर औरंगाबाद येथून महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत. तर नागपूरातून देखील महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले हे आघाडीवर आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.