Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कॅब बुकींगच्या आमिषाने सव्वा लाखांचा गंडा

कॅब बुकींगच्या आमिषाने सव्वा लाखांचा गंडा



सांगली : खरा पंचनामा  

कल्याणहून सांगलीला जाण्यासाठी कॅब बुकींग करण्याकरिता पन्नास टक्के सवलतीचे आमिष दाखवित लिंकच्या माध्यमातून क्रेडिट कार्डची सर्व माहिती काढून घेवून पंचशीलनगर येथील एकाची तब्बल १ लाख २० हजार ६४० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयुर मोहन निकम (रा. पंचशीलनगर) हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांचे आई-वडिल कल्याणहून सांगलीला येणार होते. त्याकरिता ऑनलाइन कॅब बुकींग करण्यासाठी ते इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेत होते. त्यावेळी एका अनोळखी क्रमांकावरुन त्यांना मोबाईलला एक लिंक पाठविण्यात आली. यानंतर लगेचच त्यांना मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधून पाठविलेल्या लिंकवरुन जर कॅब बुकींग केल्यास पन्नास टक्के सवलत मिळेल, असे आमिष दाखविले.

मयुर निकम यांनी लिंक उघडून पैसे जातात की नाही पाहण्यासाठी प्रथम १०१ रुपये पाठविले. परंतु ती रक्कम स्विकारली न गेल्याने त्यांनी अनोळखी क्रमांकाला फोन करुन पैसे ट्रान्सफर होत नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांना आणखी एक लिंक पाठवून त्यावर जॉईन होण्यास सांगण्यात आले. तेथे जॉईन झाल्यावर फिर्यादीच्या क्रेडिट कार्डची सर्व माहिती परस्पर घेतली गेली. आणि त्यांच्या कार्डवरुन १ लाख २० हजार ६४० रुपये अनोळखी खात्यात वर्ग केले गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर निकम यांनी फिर्याद दाखल केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.