दारू घोटाळ्याचा पैसा गोवा निवडणुकीत वापरला!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
दिल्लीतील कथीत दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनं एक खळबळजनक दावा केला आहे. या घोटाळ्यासंबंधीचं आरोपपत्र ईडीनं गुरुवारी न्यायालयात सादर केलं. दिल्लीच्या केजरीवाल सरकारनं दारू घोटाळ्यातील पैसा गोव्याच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत वापरला आहे. ईडीच्या या दाव्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चांगलेच भडकले आहेत. त्यांनी ईडीवर गंभीर आरोप करत पलटवार केला आहे.
ईडीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलं की, आपच्या सर्वेक्षण टीमचा भाग असलेल्या स्वयंसेवकांना जवळपास 70 लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली होती. आपचे संपर्क प्रभारी विजय नायर यांनी या मोहिमेच्या कामात गुंतलेल्या काही व्यक्तींना रोखीने पैसे मिळवण्यास सांगितले होतं.
आपच्यावतीनं विजय नायर यांना वायएसआर काँग्रेसच्या खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी, त्यांचा मुलगा राघव मागुंटा, अरबिंदो फार्माचे संचालक पी. सरथचंद्र रेड्डी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविता कलवकुंतला यांचा समावेश असलेल्या गटाकडून १०० कोटी रुपयांची किकबॅक (अवैध पैसा) मिळाली होती.
हैदराबादस्थित व्यापारी अभिषेक बोईनपल्ली यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे सहकारी दिनेश अरोरा यांच्यासोबत कट रचून हे पैसे हस्तांतरित केले होते, असं ईडीने आरोपपत्रात म्हटलं आहे.
ईडीनं या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र गुरुवारी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात हजर केलं. या पुरवणी आरोपपत्रात आपचे विजय नायर, उद्योगपती सरथ रेड्डी, बिनॉय बाबू, अभिषेक बोईनपल्ली आणि अमित अरोरा यांची नावे आहेत. पण विशेष बाब म्हणजे आरोपपत्रात मनीष सिसोदिया यांच्या नावाचा समावेश नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे ईडीनं न्यायालयात सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.