हनी ट्रॅप प्रकरणात बंटी-बबलीला अटक
अलिबाग : खरा पंचनामा
रायगडच्या अलिबागमध्ये एक हनी ट्रॅप प्रकरणात बंटी-बबलीला अटक केली आहे. त्यांनी अनेकांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढल्याची बाब समोर आली. त्यापैकी एकाने मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी या जोडीला परहूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
मागील आठवडयात अलिबागमधील हनीट्रॅप प्रकरणात समोर आलेल्या बंटी-बबलीच्या करामती हळूहळू बाहेर येत आहेत. त्यांनी अनेकांना अशाच प्रकारे जाळयात ओढल्याची बाब समोर आली आहे. त्यापैकीच एकाने मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून संजय सावंत आणि धनश्री तावरे या जोडगोळीला अटक केली आहे.
या जोडीने परहूर येथील एकाला जागा दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून जाळयात ओढले. त्यानंतर त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ क्लीप बनवली. त्याआधारे त्याला ब्लॅकमेल करुन सात लाखांची खंडणी उकळली. या जोडीकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लीप्स आणि फोटो तसेच चॅटिंग पोलिसांना मिळाले आहेत. या जोडगोळीने अनेक पैसेवाल्याना अशाच प्रकारे ब्लॅकमेल केले असल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये पायी जाणाऱ्या महिलांचे दागिणे लुटणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपींनी 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर पुण्यात घरफोडी करणाऱ्या बंटी बबलीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 98 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातला पुरुष आरोपी हॉटेल व्यवसायिक आहे तर त्याच्या साथीदार महिलेनं वकिलीचं शिक्षण घेतलंय. कर्वेनगरमधल्या जयंत इनामदार यांच्या बंगल्यात 26 नोव्हेंबरला त्यांनी घरफोडी केली होती. फॉर्च्यूनर गाडीतून रेकी करुन बंद घरात ते चोरी करायचे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.