महाराष्ट्र राज्य आयएमए मुख्य संयोजक पदी डॉ.अतुल घोडके
जयसिंगपूर : खरा पंचनामा
जयसिंगपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल प्रकाश घोडके यांची महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या मुख्य संयोजक पदी निवड झाली. सदर निवडीचे पत्र या समितीचे राज्यअध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांनी नुकतेच सुपूर्द केले.
शिरोळ तालुक्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या महापुरात आणि इतर वेळी साथीच्या आजारात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सुंदर आणि नेटके नियोजन करून सर्व वैद्यकीय परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्नशील राहिल्याबद्दल आणि कोरोना महामारीत केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल ही निवड करण्यात आली आहे. महापूर आणि कोरोना अटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकरिता गतवर्षी जयसिंगपूर इंडियन मेडिकल असोसिएशन ला महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरव करून सन्मानित करण्यात आले होते. सर्व कामाची पोचपावती म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मुख्य संयोजक पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
यावेळी डॉ. घोडके यांनी या पुढील काळात कोणत्याही आपत्ती वेळी आपण इंडियन मेडिकल असोसिएशनच्या टीम द्वारे शिरोळ तालुक्यासह राज्यभरात काम करणार असल्याचे सांगितले. शिवाय जयसिंगपूर शहरातील सर्व डॉक्टर टीमने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने जयसिंगपूर शहराला प्रथमच राज्य स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. पुढील काळात ही आपण यापेक्षाही अधिक गतीने सक्रिय राहून समाज हिताकरिता आरोग्यसेवा देण्याचे कार्य करू सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.