विश्रामबागचे पोलीस निरीक्षक पुजारी जीविशाचे प्रभारी
सांगली : खरा पंचनामा
विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार स्वप्नील कोळी याच्यावरील दाखल गुन्ह्यानंतर प्रभारी अधिकारी कल्लाप्पा पुजारी यांची जिल्हा विशेष शाखेकडे बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह दोन अधिकाऱ्यांना प्रभारी पद देण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गुरुवारी रात्री दिले आहेत.
बुधवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर गुरुवारी अधीक्षक डॉ. तेली यांनी बदलीचे आदेश दिले आहेत. जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांची मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षाकडील निरीक्षक संजय मोरे यांची विश्रामबाग पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.