आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
मुंबई : खरा पंचनामा
शाखा प्रमुखापासून ते बाळासाहेब यांच्या विचाराने प्रभावित आणि प्रेरित होऊन आम्ही शिवसैनिक झालो आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालीम तयार झालो, संघर्ष करून मुख्यमंत्री झालो, आयते नाही आलो नाही. त्यामुळे कुणाला तुम्ही आव्हान देतात. आम्ही अशी आव्हानं स्वीकारून इथपर्यंत पोहोचलो आहे. असली छोटी आव्हानं आम्ही स्वीकारत नाही. द्यायची असतील तर मोठी आव्हानं द्या असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं, त्यामुळे अशी छोटी आव्हान आम्ही स्विकारत नाही तर मोठी आव्हानं स्विकारतो. ठाकरे गटाचे नेते अदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.