Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपने मला फसवलं, पक्ष विलीन करायला सांगितलं!

भाजपने मला फसवलं, पक्ष विलीन करायला सांगितलं!



पनवेल : खरा पंचनामा

भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपवरच हल्लाबोल केला आहे. भाजपने आपल्याला फसवल्याचा आरोपच जानकरांनी केला आहे. महादेव जानकर यांची पनवेलमध्ये सभा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक खुलासे करत शिवसेना फुटीवर तसेच भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.

भाजपने मला फसवलं. मागील निवडणुकीत आमच्या उमेदवाराला त्यांनी एबी फॉर्म जोडले होते, मला धोका दिला, पण आता मी सावध झालो म्हणून आता स्वतंत्र लढणार असल्याचे सांगत जानकरांनी स्वबळाचा नारा दिला. तसंच, भाजपने मला राष्ट्रीय समाज पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास सांगितलं होतं, पण मी स्पष्ट नकार दिला. मंडळ काढणे सोपे असते पक्ष काढणे अवघड आहे, असे जानकर यावेळी म्हणाले.

पक्ष काढणाऱ्याला काय वेदना होतात जे त्यालाच माहीत. बाळंत बाईला होणाऱ्या वेदना तिलाच माहीत. त्यामुळे या मताशी मी सहमत आहे. या विधानाने जानकर यांचा उध्दव ठाकरेंना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे दिसले. 'मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली मात्र भेटीत झालेली चर्चा सांगण्यास नकार दिला, असा खुलासा यावेळी महादेव जानकर यांनी केला. या विषयावर आपण आठ दिवसांनी आपली भूमिका स्पष्ट करणार आसल्याचे जानकर यांनी सांगितलं. स्थानिक पक्षांना संपवलं जात आहे. मागे काँगेस ही तेच करत होती आणि आता भाजप ही तेच करते, भाजपची काँग्रेस झाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.