Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चिंचवड, कसबासाठी भाजपचे उमेदवार जाहीर

चिंचवड, कसबासाठी भाजपचे उमेदवार जाहीर 



पुणे : खरा पंचनामा 

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. दिनांक 18 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाने प्रयत्न केले. मात्र, महाविकास आघाडी यासाठी भाजपाने प्रयत्न केले. मात्र, महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवण्याची चिन्हे दिसू लागल्याने आज भाजपाने दोन्ही ठिकाणचे पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. 

भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक साठी हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने आता मविआतून नेमकी कोणती घोषणा होणार, हे पहावे लागेल. 

पिंपरी -चिंचवड भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवड विधानसभेचे भाजपाचे माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. तर, पुणे शहराच्या माजी महापौर आणि कसबा विधानसभेच्या भाजपाच्या माजी आमदार स्व. मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे कसबा विधानसभेकरिता पोटनिवडणूक होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.